राजकारण

ठाकरे x शिंदे गटात थेट लढत; मुरजी पटेल शिंदे गटाचे उमेदवार?

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतही ठाकरे आणि शिंदे गट आता एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शिंदे गटाने आपला उमेदवार घोषित केल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ठाकरे-शिंदे गटाच्या वादात शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले आहे. तर,अशातच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतही ठाकरे आणि शिंदे गट आता एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शिंदे गटाने आपला उमेदवार घोषित केल्याचे सूत्रांकडून समजत आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे आता शिंदे गटाकडून लढणार असल्याची माहिती समजत आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ठाकरे गट आणि भाजपने उमेदवार घोषित केली होती. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे भाजप-ठाकरे गट अशी लढत होणार होती. यादरम्यान, पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नसून त्यांना पक्षचिन्ह कशासाठी हवे आहे, असा जोरदार युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. यानंतर शिंदे गटाने खेळी केली आहे. भाजपचा उमेदवार मुरजी पटेल यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, मुरजी पटेल सध्या भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत असून शिंदे गटाचे अधिकृत सदस्य नाहीत. तरीही त्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी दिली जाऊ शकते का, हा मुद्दा आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने अगोदरच उमदेवार जाहीर केली आहे. या उमेदवाराला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने याआधीच पाठिंबा जाहीर केला आहे. आधीही हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाचा विजय होणार का, याबाबत उत्सुकता लागली आहे. तर, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीकडे रंगीत तालीम म्हणून पाहण्यात येत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा