जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की, माझ्या माहितीनुसार मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडुन दिले होते. मग पोलीसांवर कारवाई का? असे म्हणत अनिल देशमुख यांनी आरोप केला आहे.