राजकारण

...या स्टंप घेऊन आम्ही पण तयार; आशिष शेलारांचे उध्दव ठाकरेंना आव्हान

आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी अज्ञातांनी हल्ला केला होता. मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहेर काढणार म्हणूनच त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा मनसेने केला होता. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते, असा निशाणा शेलारांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

आशिष शेलारांनी ट्विटरवरुन उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे "कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशेब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे, असा खोचक प्रश्नही शेलारांनी उध्दव ठाकरेंना विचारला आहे.

आम्ही तर रोज विचारणार. कोविड मध्ये "कफना"त पण "कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत, असे थेट आव्हानच शेलारांनी उध्दव ठाकरेंना दिले आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला प्रकरण आरोप पत्र दाखल झालेला आहे त्यामधील आरोपी अशोक खरात यांनी हे सगळे उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी केला आहे, असा खुलासा केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य