राजकारण

बावनकुळेंनी भारत मातेच्या घोषणा थांबवून मोदींच्या द्यायला लावल्या? कॉंग्रेस नेत्याने शेअर केला व्हिडीओ

अतुल लोंढे यांनी व्हिडीओ शेअर करत चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अहमदनगर दौऱ्यावर असताना त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना भारत मातेच्या घोषणा देत असताना थांबवून उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या असल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच, अतुल लोंढे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे देशप्रेम किती बेगडी आहे हे लक्षात येते असे म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपला भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे कसले सनातनी हे तर बोगस ढाब्यावर चला वाले. अहमदनगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. यावरून भाजपचे देशप्रेम किती बेगडी आहे हे दिसून येते, अशी टीका अतुल लोंढेंनी केली आहे.

व्हिडीओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे मोदींचे फोटो असलेली पत्रके वाटताना दिसत असून मोदींच्या नावाच्या घोषणा उपस्थितांना द्यायला सांगत आहेत. यावेळी भारत माता की जय अशी घोषणा देणाऱ्याला त्यांनी हात करून घोषणा बंद करायला सांगत मोदींची घोषणा द्यायला लावल्या. हा प्रकार नगर शहरात एकदा नव्हे तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे, असाही दावा लोंढेंनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा