Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana 
राजकारण

Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana : बारामतीत माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाळी; अजित पवारांच्या पॅनलचे तिन्ही उमेदवार आघाडीवर

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून 2025 रोजी मतदान पार पडले.

Published by : Siddhi Naringrekar

(Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana ) माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून 2025 रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र शरद पवार यांनी मतदान केलं नाही.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची काल मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली असून निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरूच आहे. अजित पवारांच्या पॅनलचे तिन्ही उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असणारे नीलकंठेश्वर पॅनलचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत तर तावरे सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

माळेगाव कारखान्याची पहिली फेर मतमोजणी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. अजित पवार आणि तावरेंच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत मतदारांनी कोणाला पसंती दिली हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा