UddhavThackeray EknathShinde  team lokshahi
राजकारण

खानदेशसह नंदूरबारमध्ये शिवसेनेला मोठा धक्का

अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

Published by : Shubham Tate

Shiv Sena Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना समर्थ आणि खंबीरपणे पाठीशी असल्याचे दाखवण्यासाठी विरारमध्ये शिवसैनिकांनी चक्क रक्ताचा अभिषेक घातला आहे. विरार पूर्व स्टेशन जवळील शिवसेना शाखेच्या बाजूच्या शंकराच्या पिंडीवर बोटाला सुया टोचवून रक्त काढून हा अभिषेक घालण्यात आला आहे. तर दुसरीकडे आमदार आणि खासदारांनंतर आता नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचेही शिंदे गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. राज्यातील विविध शहरातील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये आता खानदेश आणि नंदूरबार येथील नेत्यांचीही भर पडली आहे. (Big blow to Shiv Sena in Khandesh and Nandurbar)

शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी हे देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी शेकडो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नंदनवन येथे शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिक नेमका कोणत्या गटाचा असा संभ्रम निर्माण झाला असून कोणत्या गटाचे हे शिवसैनिकांना सिद्ध करावे लागत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी