Bacchu Kadu Accident  Team Lokshahi
राजकारण

मोठी बातमी! आमदार बच्चू कडू यांचा भीषण अपघात; डोक्याला गंभीर इजा

बच्चू कडू उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमरावती | सुरज दहात : आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्ता क्रॉस करताना ही घटना घडली असल्याचे समजत आहे.

शहरात सकाळी 6 ते साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला जबर मार लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच, उजव्या पायाला मोठी इजा झाली आहे. त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

तत्पुर्वी, बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराजी बोलून दाखवली होती. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, असं आवाहन बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं होते.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे कारला अपघात झाला होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असून अपघातात धनंजय मुंडेंच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. या दुखापतीनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्याही गाडीला अपघात झाला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक