admin
राजकारण

राज्यपाल शिवेनरीवर चालत गेलेत, हिम्मत असेल तर तुम्हीही पायी चढा अन् मग...; चंद्रकांत पाटलांचे आव्हान

राज्यपालांविरोधात विरोधकांकडून निदर्शने करण्यात येत आहे. तर, सत्ताधारी पक्षामधूनही राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांविरोधात विरोधकांकडून निदर्शने करण्यात येत आहे. तर, सत्ताधारी पक्षामधूनही राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल शिवेनरीवर चालत गेले, तुम्ही कधी गेला आहेत का चालत? हिम्मत असेल तर ते आधी पायी चढा आणि मग भक्ती दाखवा, असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना भूगोल कळतो का. रोज सकाळी उठायचे आणि भाषण करायची. आम्ही काही भूमिका मांडली की त्यांना प्रॉब्लेम आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, शिवराय यांचा अपमान कोणी करू शकत नाही. त्यांच्यामुळे आज आपण उभे आहेत. राज्यपाल शिवेनरीवर चालत गेले, तुम्ही कधी गेला आहेत का चालत? हिम्मत असेल तर ते आधी पायी चढा आणि मग भक्ती दाखवा, असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे. या वयात राज्यपाल शिवनेरीला पायी चालत गेले. त्यांच्या मनात महाराज यांच्याबद्दल काही असेलच ना. ज्या माणसाच्या मनात महाराजांच्या मनात आदर आहे, त्यांच्या एका वाक्याला एवढा का विरोध होत आहे, असे प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तर, राज्यपालांविरोधात छत्रपती उदयनराजे भोसले रायगडमध्ये आक्रोश आंदोलन करणार आहे. यावेळी एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात, अशा शब्दात उदयनराजे यांनी आपला राग व्यक्त केला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, उदयन राजे आमचे नेते आहेत. ज्या राज्यपालांनी पायी जाऊन दर्शन घेतले. त्यांच्याकडून काही बोललं गेले असेल तर त्यांना हाथ जोडून विनंती आहे की हा विषय संपवा, असे आवाहन चंद्रकांत पाटलांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा