राजकारण

दंगली घडविणे आमच्या रक्तात नाही; बावनकुळेंचा विरोधकांवर घणाघात

राज्यात दंगलीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपकडून जातीय तेढ निर्माण केले जात असल्याची टीका विरोधक करत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : राज्यात दंगलीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपकडून जातीय तेढ निर्माण केले जात असल्याची टीका विरोधक करत आहेत. या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही दंगल घडवून मत मागत नाही. आम्ही विकास करुन मत मागतो. दंगली घडविणे आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात बावनकुळेंनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

प्रत्येक धर्माची परंपरा आहे. जे नियमात नाही त्या थांबल्या पाहिजे. समजात तेढ वाढेल असे कृत्य करू नये. भाजपच्या लोकांनी आंदोलन केले त्यामुळे असंतोष निर्माण झालं नाही. धार्मिक व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न असेल म्हणून आंदोलन केले, असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

तर, दोन हजारांच्या नोटा रद्द झाल्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, ज्या इमानदरीच्या नोटा आहेत त्यांना प्रॉब्लम नाही. बेईमानी आणि काळा पैसा त्यांना प्रॉब्लम आहे. काळा पैसा ज्यांनी जमवला त्यांना अडचण आहे. अशा ट्रायलने काळा पैसा जमविणाऱ्यांना चाप बसेल. किती काळा पैसा बाहेर आला हे सांगायचे नसते. किती ठिकाणी धाडी पडल्या, हाच काळा पैसा आहे. जे विरोध करत आहे त्यांच्याकडे काळा पैसा असल्याचा निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला आहे.

दरम्यान, आमच्या आमदारांनी आणि सरकारने कामे केलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक कामे केली आहे. नाशिककरांना जे काही हवंय ते दिले आहे. जे नाशिक दिसतंय त्यात देवेंद्र फडणवीस यांचा रोल आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा