राजकारण

शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घरगुती तमाशा; बावनकुळेंचे घणाघात

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. यामुळे राजकारणात एकच खळबळ माजली होती. कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन केले. अखेर सर्वांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवारांनी जाहिर केले. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता. पक्ष टिकवण्यासाठी ही सगळी नौटंकी आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही तीन दिवस झाले ती सगळी स्क्रिप्ट होती. शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. शरद पवार दुसऱ्याला कसं पक्षाचा अध्यक्ष होऊ देतील. राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

लोकशाही पहायची असेल तर भाजपाकडे बघा. दुसऱ्या पक्षात लोकशाही नाही केवळ घराणेशाही आहे. यांना दुसऱ्याला मोठं करायंच नाही. हे आपला पक्ष दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. शरद पवार हे शेवटपर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहतील. पक्ष टिकवण्यासाठी ही सगळी नौटंकी आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

यात भाजपचा कुठलाही डाव नव्हता. अजित पवार यांचा मागच्या चार महिन्यापासून माझा संपर्क झाला नाही किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत हेच मी सांगत होतो. त्यांच्या महाविकास आघाडीकडूनच अजित पवारांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही बावनकुळेंनी केला आहे.

दरम्यान, सीमावर्ती भागात भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात उमेदवार उभे केले आहेत. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, कर्नाटकात भाजपला निवडून येण्यासाठी कुणाचीही गरज नाही. मोदींच्या नेतृत्वात आम्ही कर्नाटक जिंकू तिथे भाजपचे सरकार येईल. भाजपा कमळाच्या समोर कॉम्प्रमाईज करत नाही. मराठी भाषेला आणि मराठी माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका कायम आहे. पण, पक्ष आणि पक्षाचा नेता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा