Sudhir Tambe | Chhagan Bhujbal Team Lokshahi
राजकारण

सुधीर तांबेंबद्दल आदर होता, पण एका तासात पालापाचोळा झाला : भुजबळ

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापले आहे. महाविकास आघाडी समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये सभा घेत सुधीर व सत्यजित तांबे यांच्यावर निशाणा साधला. मला सुधीर तांबे यांच्याबद्दल आदर होता. पण, एका तासात पालापाचोळा झाला, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

ही निवडणूक फार वेगळ्या अर्थाने होत आहे. दोन महिन्यांपूर्वी सुधीर तांबे माझ्याकडे आले होते. मी म्हटले तुम्ही निवडून याल. दीड महिन्यांपूर्वी मतदार नोंदणीचे काम सुरू होते. मी ऐकलं की, त्यांनी एबी फॉर्म आणला. पण, जे घडू नये, ते घडलं. फॉर्म भरायच्या वेळी स्थानिक नेते म्हणाले आपल्याला आमंत्रण नाही आलं, काय करायचं..? मी बाळासाहेब थोरात यांना फोन केला, त्यांचा फोन बंद आला. आम्हाला सांगण्यात आलं की, थोड्या वेळाने आमंत्रण येईल, पण बघतो तर वेगळंच घडलं. मला सुधीर तांबे यांच्याबद्दल आदर होता. पण, एका तासात पालापाचोळा झाला, अशी जोरदार टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

सुधीर तांबेंनी जर सांगितलं असतं की, मला उमेदवारी नको, तर वेगळा विचार झाला असता. पण, असं करून सुधीर तांबे यांनी मुलासाठी बाळासाहेब थोरात आणि मोठा पक्ष काँग्रेसला देखील अडचणीत आणले. मला पाठिंबा देणाऱ्यांना सांगायचं आहे की, ज्यांना तीन वेळा निवडून आणले, त्यांनी अशा रीतीने फसवले. लोकं सोडून जातात, अशा घटना घडतात. पण, फॉर्म मिळूनही न भरणे, हे चुकीचं आहे. दोघे जण सुशिक्षित आहे. असं व्हायला नको होतो. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. यात महाविकास आघाडीची ताकद आहे. आम्ही तुम्हाला (तांबे यांना) सहकार्य करणार नाही. आपण सगळ्यांनी शुभांगी पाटील यांच्या मागे उभे राहायला हवे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

पसंतीक्रमाची निवडणूक फार धोकादायक असते. उमेदवार पडला पडला असं वाटत असताना तो निवडून येतो. त्यामुळे फक्त आणि फक्त एक नंबर पसंती क्रमांक द्यायचा. पुढे महापालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुका आहे. इकडे गडबड केली, तर पुढे तुमची गडबड होईल. आपली एकजूट आपल्याला भक्कम ठेवायची आहे. सच्चे काँग्रेसवाले आपल्यासोबत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. 1999 साली अशीच गडबड झाली. कॉंगेस आणि राष्ट्रवादी वेगळे झाले. काही जणं म्हणाले आम्ही, पवार साहेबांना मतदान केलं. आणि निशाणी कोणती, ते विचारलं तर म्हणाले की, पंजाला मतदान केलं, असा किस्साही छगन भुजबळ यांनी सांगितला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा