मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. तसंच बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच ही संधी मिळाली आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांचे विचार राज्यात पुढे नेतोय, असं प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलं आहे.
बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतीस्थळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच आपल्याला ही संधी मिळाली आणि या सगळ्या घडामोडी शक्य झाल्या. त्यांचे विचार मी आणि माझ्यासोबतचे आमदार पुढे नेतील.
राज्यात मराठी माणसाला, हिंदुत्वाला ताठ मानेने जगण्याची शिकवण त्यांनी दिली. तसेच बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही चालत आहोत. आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करू. सर्व समाजघटकांचा उत्कर्ष, विकास हेच आमचं ध्येय असेल. म्हणूनच त्यांना वंदन करुन आम्ही आशीर्वाद घेतले आहेत. बाळासाहेब आमच्या पाठीशी आहेत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.