Eknath Shinde | Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत, मांडणार भुमिका

कॅबिनेट बैठकीनंतर निर्णय होणार जाहीर

Published by : Shubham Tate

uddhav thackeray Eknath Shinde : शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत फिरण्याचं आवाहन केलं आहे. मात्र एकनाथ शिंदेंसह पाचही कॅबिनेट आणि चार राज्यमंत्र्यांची मंत्रिपदं काढणारे मुख्यमंत्री २४ तासांच्या आत इतके मवाळ कसे झाले, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. भाजपने सत्तासंघर्षावर नजर ठेवून असल्याची उघड भूमिका घेतल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आस्ते कदम टाकत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. (cm uddhav thackeray writes to rebellious mlas to returns is this fear of bjp Eknath Shinde)

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं असल्याची कबुली दीपक केसरकरांनी दिली आहे. महाराष्ट्रात जेवढ्या लवकरात लवकर येता येईल तेवढा प्रयत्न केला जाईल. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे अशी ही टीका त्यांनी नाव न घेता शिवसेना प्रमुख उद्वव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांच्यावर केली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात रंगलेल्या सत्ताकारणात एक महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळातच राजीनामा देणार असल्याच्या अटकळा लावल्या जात आहे. महाविकास आघाडीतील काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांशी त्यांनी याविषयावर चर्चा केल्याचंही बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणारी आजची कॅबिनेट बैठक या राज्यमंत्रीमंडळाची शेवटची बैठक असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी अचानक आज संध्याकाळी पाच वाजता ही बैठक बोलावली असून या बैठकीत ते महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनानं शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजुनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :आज मोर्चा निघायला पाहिजे होता - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश