Sanjay Raut | Rajya Sabha Team Lokshahi
राजकारण

सुहास कांदे चुकले? संजय राऊतांना बसणार फटका

सुहास कांदे यांनी संजय राऊत यांना पहिल्या पसंतीचे मत दिले असेल तर...

Published by : Shubham Tate

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस असून एक- एक मत महत्त्वाचं आहे. अशात आता शिवसेनेला धक्का बसला असून शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयने दिली आहे. पण, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचे मत वैध्य धरण्यात आले आहे. तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे हे मत वैध धरण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरचे संजय जाधव की धनंजय मुंडे, कोण जिंकणार? काही वेळातच कळणार आहे.

त्यामुळे मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला. तसेच, सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या मताचं गणित बिघडणार आहे. संजय राऊत यांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 42 मतांची गरज आहे. तर संजय पवार यांनाही दुसऱ्या पसंतीच्या मताची गरज आहे. पण जर सुहास कांदे यांनी संजय राऊत यांना पहिल्या पसंतीचे मत दिले असेल आणि संजय पवार यांना दुसऱ्या पसंतीचे मत दिले असेल तर त्यांचे मत बाद ठरणार आहे. (Counting of votes for the six seats of Rajya Sabha election begins)

देशभरात राज्यसभेच्या 56 जागांसाठी 10 जुन रोजी मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान या राज्यांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी दुपारी चार वाजेपर्यंत मतदान पार पडलं. राज्यात देखील चार वाजेपर्यंत मतदान पार पडलं, त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित होतं. मात्र भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत आधी राज्याच्या आणि त्यानंतर राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. मात्र आयोगाने मतं अवैध ठरवण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ मुक्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. भाजपने आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे या निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. रात्री साडेबारापर्यंत सुद्धा मतमोजणी सुरु झाली नव्हती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा