Devendra Fadanvis | Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, काहींना जनाची...

आॅडिओ क्लिप एेकवत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा' म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक टीका केली होती.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. याच गदारोळा दरम्यान आज बुलढाण्यात शिवसेना ठाकरे गटाचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्वच विषयावर भाष्य केले. या वेळी त्यांनी सुरु असलेल्या राजकारणावरून शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मात्र, यावेळी बोलता बोलता उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. याच टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय दिले देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर?

उध्दव ठाकरे यांनी भरसभेत शेतकर्यांच्या वीजबिल माफीच्या मागणी संबंधीची आॅडिओ क्लिप एेकवत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा' म्हणत खोचक टीका केली होती. आता ठाकरेंच्या त्याच टीकेवर फडणवीसांनी ट्विटरवरून जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले की, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही...! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय्... सोबतच त्यांनी एक जुना उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पुढे दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही... महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे...शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे! असे ते ट्विटमधून म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

राज्यात वीज कापणी सुरु आहे. लाईट बिलासाठी तकादा लावला जात आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ ऐकवत टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात असताना वीज बिल माफीची मागणी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज तुम्ही त्या ठिकाणी आणि मी या ठिकाणी आहे. शेतकर्‍यांचे वीज बील माफ करा! खाली असताना वेगळी भाषा आणि वर बसल्यावर वेगळी भाषा? देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा!” असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली