राजकारण

एकनाथ शिंदेंच्या जाहिरात नाट्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचा प्रवास...

सलग दोन दिवस वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिराती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पालघर : सलग दोन दिवस वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिराती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकेची तोफ डागली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. या जाहिरात नाट्यावर पहिल्यादांच फडणवीसांनी प्रतिक्रिया जाहिरपणे दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरलो. एकाने विचारले की, तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला. कसं वाटतं आहे? आमचा 25 वर्षांपासून एकत्र प्रवास आहे, पण गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही, असा निशाणा फडणवीसांनी विरोधकांवर साधला. आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही आमचा प्रवास एकत्रच असेल. एका जाहिरातीमुळे सरकारला काहीही होणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही. हे जुने सरकार नाही. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर यावरून गच्ची पकडणारे आम्ही पाहिले. मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे, अशीही टीका देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा