Raj Thackeray|Hanuman Chalisa team lokshahi
राजकारण

राज ठाकरेंच्या 'भोंगे हटाव' आंदोलन पत्रकाचे वाटप सुरू

आंदोलन अजून व्यापक करण्यासाठी सर्वांना हाक

Published by : Shubham Tate

अकोला अमोल नांदूरकर :- सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दाखला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी मुंबई शिवाजी पार्क येथील गुडीपाडवा मेळाव्यामध्ये, भोंगे हटावचा एल्गार केला होता व सरकारला विनापरवाना सुरू असलेले भोंगे बंद करण्याबाबत ४ मे चा एलटीमेटम दिला होता. मशिदीवरील भोंगे जर बंद झाले नाहीत तर त्यासमोर दुपट्ट आवाजात हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठन करण्यास मनसैनिकांना (MNS) आदेशीत केले होते. (Distribution of Raj Thackeray's horn removal agitation leaflets started in Akola)

जवळपास सकाळचे अजान बंद असल्याचे आढळून आले आहे, पण तरीही भोंगे हे चालूच आहेत. त्यासंदर्भात राज ठाकरे ह्यांनी एक पत्रक महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी काढले आहे. ह्या पत्रकात त्यांनी भोंगे संदर्भात विस्तृत खुलासा केला आहे. सर्वसामान्य जनतेने आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन अजून व्यापक करण्यासाठी सर्वांना हाक दिली आहे.

तसेच एक सूचना वजा आदेश पत्रक सर्व मनसैनिकांना देऊन त्यांनी राज ठाकरे ह्यांच्या सहिनिशी असलेले पत्र महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या घरी व आस्थापनावर जाऊन देण्यास आदेशीत केले आहे. त्याच अनुषंगाने मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे ह्यांनी सदर पत्रक जिल्हा तसेच शहर कार्यकारणी ह्यांना वितरित केले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, महानगर अध्यक्ष सौरभ भगत, शहर सचिव ऍड अजय लोंढे, अकोला तालुकाध्यक्ष सचिन गव्हाळे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट, उपजिल्हाध्यक्ष मनविसे डॉ. जय मालोकार, राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफळे, मिलिंद मुळतकर, वैभव कोहर, आकाश शेजे, सौरभ तिवारी आदी मनसैनिक उपस्थित होते. त्यानंतर लगेच शहर व ग्रामीण भागात सदर पत्रकाचे वाटप सर्व मनसैनिकांकडून प्रत्यक्षात सुरू करण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा