राजकारण

संजय राऊतांच्या दुसऱ्या घरीही ईडीचा छापा; अडचणी वाढल्या

Sanjay Raut : पाच तास उलटूनही संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु

Published by : Team Lokshahi

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे. पाच तास उलटूनही संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. अशात राऊतांच्या अन्य दोन घरांवरही ईडीने छापा टाकला आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र, यानंतर आज दिल्लीतील ईडीचे अधिकारी मुंबईत दाखल होत थेट भांडूप येथील संजय राऊतांचे घर गाठले. व सकाळपासून राऊत आणि कुटुंबियांची चौकशी सुरु आहे.

तर, संजय राऊत यांच्या कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या घरावर छापा पडल्याचं कळताच शिवसैनिकांनी त्यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलना करण्यास सुरुवात केली. याचवेळी संजय राऊत यांनी खिडकीतून हात उंचावले त्यावेळी बंगल्याबाहेर असलेल्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच