ED Summons Sonia Gandhi | money laundering case | rahul gandhi team lokshahi
राजकारण

ED Summons Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ, ईडीने पुन्हा बजावले समन्स

21 जुलैला हजर राहण्यास सांगितले

Published by : Shubham Tate

ED Summons Sonia Gandhi : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा समन्स बजावले आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती. (ed summons sonia gandhi on july 21 national herald money laundering case rahul gandhi)

कोरोनाशी लढा देत असलेल्या सोनिया गांधी यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्या काही आठवडे ईडीसमोर हजर राहू शकणार नाहीत, असे सांगण्यात आले. ईडीनेही त्यांची विनंती मान्य केली होती. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जुलैच्या अखेरीस चौकशी एजन्सीसमोर हजर राहून मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

राहुल गांधींची बराच वेळ चौकशी करण्यात आली

या प्रकरणी राहुल गांधी यांची पाच दिवसांत सुमारे 50 तास चौकशी करण्यात आली आहे. यादरम्यान त्यांचे जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?