Devendra Fadnavis | Eknath Shinde  Team Lokshahi
राजकारण

राष्ट्रवादीची खाती भाजपाकडे; शिंदे गटाला काय?, खातेवाटपाचं वैशिष्ठ्यं

देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक

Published by : Shubham Tate

eknath shinde government : सरकार बनविण्यात जसं देवेंद्र फडणवीस यांचं मोठं कर्तृत्व राहिलं तसंच खातेवाटप करण्यातही देवेंद्र फडणवीसांचा वरचष्मा दिसून येत आहे. कारण आज जाहीर झालेल्या शिंदे सरकारच्या खातेवाटपावर नजर मारल्यास देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक लक्षात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवेसेनेला मुख्यमंत्री देऊन राष्ट्रवादीने महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली. तोच पॅटर्न आता देवेंद्र फडणवीस यांनी वापरला आहे. यामध्येही अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या चार बड्या नेत्यांची महत्त्वाची खाती त्यांनी आपल्याकडेच ठेवली आहेत. (eknath shinde government cabinet minister portfolio devendra fadanvis)

त्यात गृह, अर्थ, जलसंपदा या मंत्र्यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर काँग्रेसकडे असलेले उर्जामंत्रीपदही फडणवीसांकडे गेलेले आहे. तसेच फडणवीस यांचे नीकटवर्तीय असलेले गिरीश महाजन, काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण यांना महत्त्वाची खाती मिळालेली आहेत. तर चंद्रकांत दादा पाटील आणि सुधार मुनगंटीवार या ज्येष्ठ मंत्र्यांना तुलनते कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. तर शिंदे गटातही अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या पारड्यात चांगली खाती गेली आहेत.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार-

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील-

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित-

आदिवासी विकास

गिरीष महाजन-

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील-

पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे-

बंदरे व खनिकर्म

संजय राठोड-

अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे-

कामगार

संदीपान भुमरे-

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत-

उद्योग

प्रा.तानाजी सावंत-

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण -

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार-

कृषी

दीपक केसरकर-

शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे-

सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई-

राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा-

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा