Eknath Shinde and Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची ‘सर्वोच्च’ सुनावणी पुन्हा लांबणीवर?

त्यामुळे ही सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता

Published by : Shubham Tate

Eknath Shinde vs Uddhav thackeray : शिवसेनेवर कोणाचा अधिकार आहे? हा प्रश्न अजूनही तसाच आहे. याशिवाय 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरणही सुरू आहे. या दोन्ही मुद्यांवर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचे की नाही, याचा निर्णय न्यायालयात होणार आहे. शिंदे गटाचे वकील घटनापीठ स्थापन करून सुनावणीची मागणी करू शकतात, अशीही बातमी आहे. (Eknath Shinde vs Uddhav thackeray whose shiv sena hearing in supreme court)

दरम्यान, गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी दोन वेळा लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळंत आहे. आज म्हणजे 22 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी उद्या म्हणजे 23 ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता उद्या होणाऱ्या सुनावणींमध्येही महाराष्ट्रातील हे प्रकरण नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्यावरील अपात्रतेचा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले होते. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, शिंदे गटात सामील होणारे आमदार जोपर्यंत विभक्त गट दुसऱ्या पक्षात विलीन करत नाहीत तोपर्यंत ते अपात्रतेपासून वाचू शकत नाहीत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात