राजकारण

चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष शिंदे गटात नाराज; मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

माजी उपनगराध्यक्ष शिवसेनेतून बाहेर पडत स्वगृही अथवा अन्य कोणत्या पक्षात जातील? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

निसार शेख | चिपळूण : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह चार नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला होता. पण पक्षप्रवेशावेळी दिलेली अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे हे नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

आपण चिपळूण मधील ज्या विकासकामासाठी पक्षात प्रवेश केला. त्यातले कोणतेच विकासकाम होणार नसेल तर मग गरज काय? असा पवित्रा सुधीर शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे चिपळूणचा राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुधीर शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

सुधीर शिंदे यांनी पक्षप्रवेशावेळी चिपळूण शहरासाठी असलेल्या निळी-लाल पुररेषा बाबत केलेली रद्दची मागणी अद्याप प्रलंबित आहे. तसेच, नदीला संरक्षक भिंतीसाठीचा आपण पाठपुरावा केला ठराव ही दिले. मात्र, त्याबाबतही अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. आमची विकास कामे होणार नसतील तर गरजच काय? असा थेट सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आपण गेले महिना व नाराज आहोत आणि तसं आपण कार्यकर्त्यांनाही सांगितल आहे.

ते पुढे म्हणाले की, आपली याबाबत अजून चर्चा सुरू असून आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आपण पूर्वीपासून काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होतो. पण, विकासकामं होतील म्हणून आम्ही शिवसेनेत विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. मात्र, त्यावेळी दिलेल्या आश्वासनांमध्ये कोणतीही प्रगती नाही, आम्ही विकास कामासाठी प्रवेश केला बाकी आमची कोणती मागणी नव्हती. विकास कामांव्यतिरिक्त कोणत्याही ऑफर स्वीकारणारे आम्ही कार्यकर्ते नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

त्यामुळे माजी उपाध्यक्ष सुधीर शिंदे हे शिवसेनेत आपण नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्या बाबत माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याजवळ त्यांची चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. या चर्चेला कोणते यश येत का? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

चिपळूण शहराच्या विकासाला बाधा असणारी निळी-लाल पुररेषा रद्द करण्याची प्रमुख मागणी होती. चिपळूण नगर परिषदेने चार वर्षांपूर्वी चिपळूणमधील नद्यांना मेरिटाईम बोर्डाकडून संरक्षक भिंत बांधणे, यासाठी ठराव केला होता. या ठरावासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली. याकरिता हजारो कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. चिपळूण शहरासाठी नळपाणी योजना राबविणे याप्रमाणे पैकी कोणती मागणी पूर्ण झालेली नाही, असे सुधीर शिंदे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे मोठा जनसंपर्क असलेले चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे पुढील काळात कोणता निर्णय घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या विकासकाराच्या मागण्या पूर्ण करून त्यांना थांबवण्यात यश येते किंवा ते शिवसेनेतून बाहेर पडत काँग्रेसमध्ये स्वगृही अथवा अन्य कोणत्या पक्षात जातील? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?