राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,” असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हारतुरे, पुष्पगुच्छ नको, फक्त शुभेच्छा द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन

शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात