Kirit Somaiya team lokshahi
राजकारण

राऊतांनंतर ‘हा’ नेता तुरुंगात जाणार, किरीट सोमय्यांचा दावा

उद्धव ठाकरेंचा डावा हातही जेलमध्ये जाणार

Published by : Team Lokshahi

Kirit Somaiya : शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. यावर शिवसेना लवकरच इतिहास जमा होणार अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याचे किरीट सोमय्या यांनीच आरोप केले होते. त्यावरून राऊत आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. (Kirit Somaiya on sanjay raut ed coustody)

दरम्यान, ही वेगळीच दुसरी कुठली तरी चौकशी सुरु आहे. पत्राचाळचा संबंध नाही याच्याशी,” असं म्हटलं जात असल्याचा संदर्भ देत पत्रकाराने प्रश्न विचारला असता सोमय्या यांनी अनेक बड्या नेत्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणारे राऊत जसे तुरुंगात गेले तसा डावा हातही तुरुंगात जाणार असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच संजय राऊत यांच्या अटकेचा पत्राचाळशी काही सबंध नसल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नेमके प्रकरण काय असा सवाल देखील उपस्थित झाला आहे.

मुंबईमधील सदनिका आणि परदेश वार्‍या या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार, तेव्हा नक्कीच आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊत यांना मिळेल." असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावांसहीत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सध्या तुरुंगात असणाऱ्या नवाब मलिक व अनिल देशमुख यांचाही उल्लेख केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

AsiaCup 2025 : BCCI च्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ,शुभमन गिल उपकर्णधार

Sanjay Raut PC : 'बहुमत असूनही NDA कडून आमच्या मित्रपक्षाला फोन का केला जातो?' संजय राऊत यांचा सवाल

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...

Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?