Government Job | fake sports certificate
Government Job | fake sports certificateteam lokshahi

सरकारी नोकरीसाठी आता 'हे' प्रमाणपत्र चालणार नाही, सॉफ्टवेअरद्वारे होणार पडताळणी

नवीन सॉफ्टवेअरसह काम सुरू करण्याची योजना
Published by :
Team Lokshahi

government job : सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी उमेदवारांकडून बनावट क्रीडा प्रमाणपत्रे सादर करणे ही प्रदीर्घ काळापासून समस्या होती, मात्र आता या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) चे हे सॉफ्टवेअर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये उपलब्ध आहे. (government jobs fake sports certificate verification software)

Government Job | fake sports certificate
Breast Cancer : महिलांमध्ये कर्करोगाची प्रकरणे झपाट्याने वाढतायत, अशी घ्या काळजी

कागदपत्र पडताळणीसाठी सॉफ्टवेअर तयार

महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पीटीआयला सांगितले की, सॉफ्टवेअरची चाचणी अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचा वापर सुरू होईल. महाराष्ट्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये किमान राज्यस्तरीय स्पर्धा जिंकलेल्या उमेदवारांसाठी पाच टक्के कोटा आहे. या कोट्याअंतर्गत सादर केलेल्या क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची सध्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे.

Government Job | fake sports certificate
व्हॉट्सअॅपमध्ये मोठा बदल, ग्रुप अॅडमिनला असणार हे अधिकार

नवीन सॉफ्टवेअरसह काम सुरू करण्याची योजना

कमी कालावधीत अशा कागदपत्रांची खरी पडताळणी करणे तपास अधिकाऱ्यांना जवळपास अशक्य आहे. अशा वेळी एनआयसी सॉफ्टवेअरची भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना मोठी मदत होणार आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी एनआयसीची मदत घेण्यात आल्याचे बकोरिया यांनी सांगितले. या प्रक्रियेत खेळाडूंची प्रमाणपत्रे एनआयसीच्या मेघराज या क्लाउड स्टोरेज प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाणार आहेत.

त्याचा सध्याचा डेटा साठवण्याची क्षमता 70 GB आहे आणि ती गरजेनुसार वाढवली जाईल. येत्या 8 ऑगस्टपासून नवीन सॉफ्टवेअरसह काम सुरू करण्याचा आमचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. लाँच केल्यानंतर, प्रत्येक नवीन प्रमाणपत्रात एक QR कोड असेल, जो कोठेही आणि कोणत्याही प्राधिकरणाद्वारे त्याची सत्यता तपासण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com