devendra bhuyar team lokshahi
राजकारण

आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाईन फ्लूची लागण

नागरिकांनी रोगराई टाळून स्वतःची काळजी घ्यावी; देवेंद्र भुयार

Published by : Shubham Tate

devendra bhuyar : आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या साथीसोबतच स्वाइन फ्लूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुंबईसह राज्यात स्वाइन फ्लूने चिंता वाढवली आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाचेही टेन्शन वाढले आहे. (mla devendra bhuyar gets swine flu)

मोर्शी-वरूडचे युवा आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर स्वाइन फ्लूमुळे मुंबईत उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र भुयार यांच्या वरुड विधानसभा मतदारसंघात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्वाइन फ्लूमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या देवेंद्र भुयार यांचा बाधितांना नुकसानभरपाईची मागणी करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी रोगराई टाळून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा