MNS Banners in Dombivali West Team Lokshahi
राजकारण

डोंबिवली पश्चिम भागात मनसेचे बॅनर्स का आहेत चर्चेत?

आपली निशाणी रेल्वे इंजिन असा बॅनरवर उल्लेख... शिंदे गट आणि ठाकरे गटांना डिवचल्याचा प्रयत्न?

Published by : Vikrant Shinde

प्रतिनिधी मयुरेश जाधव | डोंबिवली: अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला असतानाच आता मनसेने डोंबिवली पश्चिमेत मनसेची बॅनर बाजी करत रेल्वे इंजिन हे चिन्ह लोकांपर्यत पोचवण्यास सुरवात केली आहे.

डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात बॅनरचा विषय चर्चेत:

डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून मनसे विरुद्ध शिंदे गट यांच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू आहे.शिंदे गटाने बॅनरबाजी करून मनसेचे चिन्ह रेल्वे इंजिन हे बॅनर उलटे लावत मनसेला डिवचण्याचं प्रयत्न केला होता.यातच अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याने चिन्हांचा विषय गाजू लागला आहे.त्यामुळे हिच संधी साधून मनसेने डोंबिवली शहरात आमची निशाणी रेल्वे इंजिन असा उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आले आहेत.तर हा बॅनर शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला डिवचण्यासाठी लावण्यात आला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहेत याबाबत डोंबिवली शहराचे मनसेचे शहर सचिव संदीप म्हात्रे यांना विचारलं असता आम्ही कोणाला डिवचण्यासाठी हे बॅनर लावले नाहीत त्याच प्रमाणे आमच्या पक्षाचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे तरी डोंबिवली शहरात हे बॅनर दोन्ही गटाला डिचवण्यासाठी लावले असावे अशी चर्चा आता होऊ लागली आहे.त्यामुळे हे बॅनर आता लक्ष वेधून घेत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा