dahi handi | insurance cover | MNS  team lokshahi
राजकारण

मनसे गोविंदांसाठी रसावली पुढे, 100 कोटींची केली तरतुद

विमा संरक्षणाचा असा घ्या फायदा

Published by : Shubham Tate

dahi handi : मुंबईत दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, यावेळी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दहीहंडीदरम्यान गोविंदा कधी-कधी अपघातात जखमी होतो. अशात त्याच्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक स्थिती बिघडते. या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी मनसे आणि भाजपने पुढाकार घेतला आहे. (mns provide insurance cover to govindas who participated in dahi handi)

नवी मुंबईत अपघातग्रस्त गोविंदांना मनसेने 'विमा कवच' देऊ केले आहे. या योजनेंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवणाऱ्या 1 हजार गोविंदांना 100 कोटींचा मोफत विमा दिला जाणार आहे.

गोविंदाच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी मनसेने 'विमा सुरक्षा कवच' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील विम्याचा कालावधी 19 ऑगस्टला पूर्ण दिवस असेल.

गोविंदाच्या पथकांनी 'सुरक्षा कवच' योजनेचा लाभ घ्यावा, मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदाचे नाव त्याच्या वयासह नोंदवावे आणि मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे पाठवावेत, असे आवाहन मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदा किंवा संघांना कोणताही खर्च करावा लागणार नसल्याची माहितीही गजानन काळे यांनी दिली.

या योजनेंतर्गत गोविंदाच्या कुटुंबाला अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये आणि अपघातामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. नवी मुंबईतील गोविंदांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या वतीने करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?