PM Modi | Nana Patole 
राजकारण

चोराला चोर म्हणणं गुन्हा! पटोलेंचे मोदी सरकारवर शरसंधान, आमची तुफाना आधीची शांतता...

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरात मोदी सरकारविरोधात पत्रकार परिषदा घेत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : देशात चोराला चोर म्हणणं गुन्हा झाला आहे. असं वातावरण मोदी सरकारच्या काळात सुरु झालेली आहे. त्याची लढाई आता आम्ही सुरु केली आहे. ललित मोदी, अशा नावांचा उल्लेखनीय केला. पण, तिसऱ्याच मोदीने आक्षेप घेतला. सजा सुनावली आणि तातडीने सदस्य त्यांची रद्द करण्यात आली. हा हुकूमशाहीचा कळस आता या केंद्र सरकारने सुरु केलं आहे, असे शरसंधान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर साधले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधींवरील कारवाईविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरात मोदी सरकारविरोधात पत्रकार परिषदा घेत आहेत.

अदानीने एलआयसीचे पैसे, पीएफचे पैसे खोटे कागद दाखवून विदेशात सेल कंपन्या सुरु केल्या. एलआयसी, सीबीआयमध्ये मेहनतीचा पैसा असतो. पीएफचे पैसे अदानीला देण्याचं काम झालं. जेवढे पीएसयू आहेत त्या अदानीला देण्याचं कामं झाल होते. सगळं खासगीकरण करायला भाजप निघाली आहे. सरकारने यावर आता लक्ष घातलं पाहिजे. डिफेन्सदेखील अदानी याला दिलं. संविधानिक आणि असंविधानिक शब्द कुठले आहेत याची नोंद असते. अदानी याला जाती-पातीवर देखील कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. हे पैसे नेमके कोणाचे आहेत? चोर के दाढी में तीनका अशी गत झालेली आहे, अशी जोरदार टीका नाना पटोलेंनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, लोकशाही चिरडण्याचं काम मोदी सरकार करत आहे. सत्याग्रह आंदोलन, रस्त्यावरच आंदोलन आम्ही करत आहोत. लोकांचा राग पाहता मोठ्या संख्येने काँग्रेसला जागा मिळतील हे दिसून येत आहे. मी सावरकर नाही फक्त एवढंच ते म्हणाले. विरोधकांना याचा त्रास नेमका का झाला? सुप्रीम कोर्टाने हे नपुंसक सरकार असं म्हटलं. या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी खोटं व्हिडिओ दाखवून दिशाभूल केली. न्यायालयाने असं काहीही म्हटलं नाही असं ते बोलले. जर त्यांना हेही कळत नसेल तर मग राज्य धोक्यात आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डला मारलं गेलं. जे काही मला माहित आहे ते संशयस्पद आहे. सामान्य जनतेला जगणं मुश्किल झालं आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर देखील हल्ला झालेला आहे. हे सरकार बरखास्त झालं पाहिजे अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत. त्यांनी त्वरित लक्ष घालून सरकार बरखास्त केलं पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करणार हे सरकार आहे. मविआला धोक्याने पाडलं याचा देखील राग लोकांच्या मनात आहे. महाराष्ट्रत ईडीची भीती घालून हे सरकार सुरु आहे, असेही नाना पटोलेंनी म्हंटले आहे.

आमची तुफानच्या आधीची शांतता आहे. महाराष्ट्र मधली कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला बिघडू द्यायची नाही आहे. मतांच्या रूपाने लोकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वैचारिक लढाई आम्ही लढत राहू. कसब्याच्या निवडणुकीत लोकांनी त्यांचा आक्रोश दाखवला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा