Navneet Rana | Sanjay Raut team lokshahi
राजकारण

'संजय राऊत शरद पवारांचे नंदी ठाकरेंचं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील’

राणांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार का यावर ते म्हणाले की...

Published by : Shubham Tate

navneet rana : खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात ठाकरे सरकारविरुद्ध चांगलंच रान पेटवलं होतं. खासकरुन हनुमान चालिसा प्रकरणानंतर त्या जास्त चर्चेत आल्या. आता त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रात नवनीत राणा यांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आता त्यांनी संजय राऊत हे पवारांचे नंदी आहेत, ते उद्धव ठाकरे यांचं राहिलेलं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील, अशी बोचरी टीका केली आहे. (navneet rana will get a big responsibility at center sanjay raut also targets uddhav thackeray)

पुढे बोलताना ते म्हणाले की, राऊत यांनी सामना पेपर सांभाळला पाहिजे. राऊत पवारसाहेबांच्या हृदयात जाऊन बसले आहेत. तसेच ते पवारांचे पगारी नोकर झाले आहेत. राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे, असा प्रश्न पडतो. ते उद्धव ठाकरेंचं राहिलेलं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील, अशा शब्दात रवी राणा यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला आहे.

तसेच मंत्रिमंडळात संधी मिळेल का यावर रवी राणा म्हणाले की, मी कधीही मंत्रिपद मागितलं नाही तसा माझा आग्रह देखील नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून विदर्भ आणि महाराष्ट्राचा विकास करणं हाच आमचा संकल्प आहे. अस म्हणत त्यांनी यावर भाष्य करणं टाळले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

AsiaCup 2025 : BCCI च्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ,शुभमन गिल उपकर्णधार

Sanjay Raut PC : 'बहुमत असूनही NDA कडून आमच्या मित्रपक्षाला फोन का केला जातो?' संजय राऊत यांचा सवाल

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...

Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?