राजकारण

ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना विनंती, कोणीही...

जयंत पाटील यांना काही दिवसापूर्वी ईडीची नोटीस आली होती. आयएल आणि एफएस (ILFS) प्रकरणात त्यांना ईडीची नोटीस आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काही दिवसापूर्वी ईडीची नोटीस आली होती. आयएल आणि एफएस (ILFS) प्रकरणात त्यांना ईडीची नोटीस आली आहे. याला उत्तर देण्यासाठी जयंत पाटील हे आज 11 वाजता ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मुंबईत कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन करणार आहेत. यावर जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन कार्यकर्त्यांना कोणीही मुंबईला येऊ नये, अशी विनंती केली आहे.

आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना 'आयएल अँड एफएस' प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी 'कमिशन रक्कम' दिल्याचा आरोप ईडीने केला आहे आणि याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जातील. मात्र, या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या 'आयएल अँड एफएस' कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जातेय. ईडी का नोटीस काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा