Supriya Sule| Chandrakant Patil  Team Lokshahi
राजकारण

ही महाराष्ट्राची हास्य जत्रा नाहीये, तुम्ही राज्याचे मंत्री; सुप्रिया सुळेंचा मंत्री चंद्रकांत पाटीलांना टोमणा

...त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटते, - सुप्रिया सुळे

Published by : Sagar Pradhan

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगारावर भाष्य केले होते. त्यावरच आता राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. ही काही महाराष्ट्राची हास्य जत्रा नाहीये. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. अशा शब्दात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एखादा मंत्री जेव्हा बोलत असतो, तेव्हा त्याला लाईटली घेणे, चेष्टेवारी घेणे गंमतजंमत करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. ही काही महाराष्ट्राची हास्य जत्रा नाहीये. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादे भाषण करता तेव्हा ते विचार करुनच करायला हवे. एवढा मोठा मंत्री जर असे विधान करत असेल तर त्याने त्यासाठी आधी निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर केली? पत्रकारांनी हे शक्य आहे का हे विचारल्यावर सुळेंनी शक्य-अशक्य ही गोष्ट मंत्र्यांनी बघायची आहे, कारण वक्तव्य त्यांनी केले आहे. असा टोला सुळे यांनी लगावला.

महाराष्ट्राची काळजी वाटते

त्या पुढे म्हणाल्या, उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असेल की सर्व खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही यासाठी निधी आहे का? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का?, हिशोब केला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत ऊठसूठ महाराष्ट्रातील नेते बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे, अशी चिंता व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा