राजकारण

Nilesh Rane : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे नाव घालवलं

निलेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेने (Shivsena) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. या सत्ता संघर्षावर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी शिंदे गट-शिवसेनेकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत 20 आमदार नाहीत. पण ते कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांची उद्धव ठाकरेंना नेता मानायची इच्छा नाही ते त्याच पार्टीत राहून नेता का बदलू शकत नाही. बाळासाहेबांचे नाव पुरतं घालवलं या उद्धव ठाकरेंनी. सुप्रीम कोर्टात सुद्धा इज्जत गेली, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान शिंदे गटाकडून हरीश शाळवे यांनी सुक्तीवाद केला. ते म्हणाले, एखाद्या पक्षातील मोठ्या संख्येने लोकांना दुसऱ्या माणसाने नेतृत्व करावे, असे वाटत असेल तर त्यात गैर ते काय. आम्ही पक्ष सोडलेला नाही. 20 आमदारांचा पाठिंबा न मिळालेल्या माणसाला मुख्यमंत्रीपद बहाल करावं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सुनवाणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना आपले मुद्दे मांडण्यासाठी पुढील 1 ऑगस्टपर्यंत वेळ दिला असून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच काही मुद्दे आवश्यक वाटल्यास या प्रकरणी विस्तारित खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवण्याची गरज आहे का यासंबंधी विचार केला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा