राजकारण

Nilesh Rane : विनायक राऊत हे कोकणाचे 'क्राईम मास्टर गोगो

निलेश राणेंनी साधला विनायक राऊतांवर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) हे ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाही, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केला होता. यावरुन भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी विनायक राऊत यांच्यावर कोकणाचा 'क्राईम मास्टर गोगो' म्हणून निशाणा साधला आहे.

राजेश क्षीरसागर यांच्या वक्तव्याचा दाखला देच निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. कोकणातल्या खासदाराची काय ओळख आहे ती बघा. विनायक राऊत जातात त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाही. कोकणाचा 'क्राईम मास्टर गोगो' अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

दरम्यान, विनायक राऊत यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्यात केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना राजेश क्षीरसागर यांनी राऊतांवर सडकून टिका केली. राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत विनायक राऊतांवर आरोप केले होते. विनायक राऊत हे ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाही, निवडणुका असो अगर कोणताही कार्यक्रम त्यांची 'बॅग' तयार ठेवायला लागते, असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस