राजकारण

सरकार म्हणजे विषकन्यासारखं असतं; का म्हणाले नितीन गडकरी असं?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी सरकारबद्दल मोठे विधान केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नलसकर | नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी सरकारबद्दल मोठे विधान केले आहे. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग आणि सरकारची छाया देखील ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो. म्हणून सरकार म्हणजे विषकन्यासारखा असतं, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी आपले मत मांडले आहे आणि सरकारपासून जो दूर राहील तो प्रगती करू शकतो, असेही त्यांनी म्हंटले.

काय म्हणाले नितीन गडकरी?

आज आपल्यासमोर सगळ्यात मोठे टार्गेट आहे की देशाच्या कृषी क्षेत्राचं उत्पन्न हे आपल्याला 22 टक्क्यापर्यंत न्यायचं आहे. आणि हे ज्या दिवशी नेऊ त्या दिवशी शेतकऱ्यांची मजुरी पंधराशे रुपये होऊन जाईल. याचा सगळ्यात मोठा कारण अस आहे की, हे करण्याकरता काही ग्रास रूट रियालिटी आहेत. माझं एक मत आजही आहे, मी विरोधी पक्ष होतो. तेव्हा होता आणि आजही आहे. त्याबाबतीत मी नेहमी म्हणतो की, देव आणि सरकार या दोघांवर आपल्या सगळ्यांचा विश्वास असतो. त्यामुळे मी पहिल्यांदा या थेरीचा समर्थक आहे. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग आणि सरकारची छाया देखील ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो. म्हणून सरकार म्हणजे विषकन्यासारखा असतो. आणि सरकारपासून जो दूर राहील तोच प्रगती करू शकतो. त्यामुळे सरकारमधील अडचणीच वेगळ्या आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

यावर्षी एमएसपीजी दिली त्यामध्ये अडचणी अशी आहे की यामध्ये मार्केट प्राइस कमी आणि एमएसपी जास्त त्याचा बॅलन्स करण्याकरता. दीड लाख कोटी दीड द्यावे लागले. परंतु, ते ठेवायाला स्टोरेज करायला गोडाऊन बरोबर नाही. त्यातून किती सडलं, काय झालं ते परमेश्वरला माहिती. मी काही त्यावर बोलत नाही, मी मंत्री असल्यामुळे मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये सरकारने काय केले पाहिजे. यावर शरद जोशींनी सुंदर सांगितलं की पॅटर्न हा ठरवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर