राजकारण

2024 च्या निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजय नोंदवेल; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान मोदींनी सुरतमधील विमानतळ आणि सूरत डायमंड बोर्सच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. सुरत डायमंड बोर्स हे जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. आज सुरत शहराच्या वैभवात आणखी एका हिऱ्याची भर पडली आहे आणि हा हिराही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल मोदींच्या गॅरंटीची चर्चा होत आहे. पाच राज्यांचे निवडणूक निकाल आल्यानंतर त्याचीच अधिक चर्चा होत आहे. येथील कष्टकरी जनतेने मोदींच्या गॅरंटीचे वास्तवात रूपांतर करताना पाहिले असून सूरत डायमंड बोर्स हेही या गॅरंटीचे उदाहरण आहे. सुरतच्या हिऱ्याला वेगळीच चमक आहे. ती जगभर ओळखली जाते.

सामान्य नागरिकांच्या मनात गॅरंटी बोलताच चार प्रमुख निकष समोर येतात. धोरण, हेतू, नेतृत्व आणि कामाचा ट्रॅक. आम्ही तीन राज्यात सरकारे स्थापन केली आहेत. तेलंगणातही भाजपच्या मतांच्या टक्केवारीत विक्रमी वाढ झाली आहे. यावरून 2024 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या 10 वर्षांत भारत आर्थिक शक्तीमध्ये 10व्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आता तिसऱ्या टर्ममध्ये भारताचा जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच समावेश होईल. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण भारताच्या बाजूने आहे. जगभरात भारताची प्रतिष्ठा शिखरावर आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. मेड इन इंडिया आता एक मजबूत ब्रँड बनला आहे, असेही पंतप्रधानांनी म्हंटले आहे.

दरम्यान, 'सुरत डायमंड बोर्स' बद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले की, ही इमारत भारतीय डिझायनर, भारतीय साहित्य आणि भारतीय संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करते. ही इमारत नव्या भारताच्या नव्या ताकदीचे आणि नव्या संकल्पाचे प्रतीक आहे. सुरत एकेकाळी सन सिटी म्हणून ओळखले जात होते. इथल्या लोकांनी आपल्या मेहनतीने डायमंड सिटी आणि सिल्क सिटी बनवली आहे. आज सुरत हे लाखो तरुणांच्या स्वप्नांचे शहर आहे. आता सुरत आयटी क्षेत्रातही प्रगती करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा