राजकारण

नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदींकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज नवीन संसद भवनात कामकाज सुरु झाले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज नवीन संसद भवनात कामकाज सुरु झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना इमारत बदलली आहे आणि मला वाटते की भावना देखील बदलली पाहिजे, असे म्हंटले आहे. तसेच, महिला आरक्षणाचे विधेयक मांडले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, येत्या काही दिवसांत देशात निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी पक्षात कोण बसणार आणि विरोधी पक्षात कोण बसणार हे जनताच ठरवेल. नवीन ठराव घेऊन नव्या संसदेत या आणि नव्या भारताची पायाभरणी करा. भूतकाळातील कटुता विसरून पुढे जायचे आहे.

आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, महिलांसाठी इतिहास बदलण्याची वेळ आली आहे. महिला आरक्षण विधेयक अनेकदा मांडण्यात आले आहे. त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. आमचे सरकार एक मोठी घटनादुरुस्ती विधेयक सादर करत आहे. या विधेयकात नारी शक्ती वंधन कायद्याच्या माध्यमातून आपली लोकशाही अधिक बळकट होणार आहे. यासाठी मी आमच्या माता, भगिनी आणि मुलींचे अभिनंदन करतो आणि या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्याचा आमचा निर्धार आहे.

मी या सभागृहातील माझ्या सर्व सहकार्‍यांना विनंती करतो की, ते सर्वानुमते मंजूर करा. महिला आरक्षण विधेयक आता नारी शक्ती वंदन कायदा म्हणून ओळखले जाणार आहे. नारी शक्ती वंदन कायद्यामुळे महिलांना बळ मिळेल आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आजची तारीख भारताच्या इतिहासात अजरामर झाली आहे, असेही मोदींनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला

Uddhav Thackeray - Raj Thackeray : मोठी बातमी; उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला

तुम्ही आवडीने शेंगदाण्याची चिक्की खाताय? तर मग 'हे' वाचाच

Dahisar Toll Naka : दहिसर टोलनाका आता वर्सोवा पुलासमोर; वाहतूक कोंडी होत असल्याने निर्णय