राजकारण

वाद पेटणार? बच्चू कडूंच्या मेळव्यात झळकले 'मैं झुकेगा नही' पोस्टर्स

एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु, बच्चू कडूंची नाराजी अद्याप दुर झालेली दिसत नाही.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु, बच्चू कडूंची नाराजी अद्याप दुर झालेली नसून प्रहार संघटनेच्या मेळाव्यात आज ते आपली भूमिका मांडणार आहे. या पार्श्वभूमीवर 'मैं झुकेगा नही'चे पोस्टर झळकले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधीचा व्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक होत थेट पोलीस स्टेशनात तक्रार नोंदवली होती. व मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले होते. अन्यथा एक तारखेला पिक्चर दाखवू, अशा शब्दात इशारा दिला होता. अखेर आता शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करत रवी राणा व बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा पडला आहे. परंतु, बच्चू कडू यांचा राग अद्याप शमला नसल्याचे दिसत आहे.

बच्चू कडू म्हणाले की, आरोपांनंतर शांत राहिलो असतो तर बदनाम झालो असतो. माझी आज कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आणि उद्या यावरची माझी भूमिका मी स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात पार्श्वभूमीवर आज प्रहारचा मेळावा होणार असून या परिसरात 'मैं झुकेगा नही'चे पोस्टर झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद