राजकारण

पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय, इतर मदत पाठवण्यापासून पंतप्रधान मोदींना कोण रोखत आहे? आंबेडकरांचा सवाल

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय, इतर मदत पाठवण्यापासून पंतप्रधान मोदींना कोण रोखत आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. ट्वीट करत त्यांनी भारताची पॅलेस्टाईन-इस्त्राईल युद्धावर भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीची ठरत असल्याची टीका केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि भाजप-आरएसएसचा पॅलेस्टाईनला समर्थन दाखवण्याचा फरक अडचणीचा आहे! इस्राईलकडून झालेल्या बॉम्ब हल्ल्याचे भाजप-आरएसएसच्या गुंडांनी केलेले समर्थन आणि कौतुक, त्याचप्रमाणे इस्रायलने केलेल्या गाझा रहिवाशांच्या सामूहिक कत्तली आणि त्याचे ह्यांच्याकडून होणारे लाजिरवाणे समर्थन यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची स्थिती विचित्र आणि अडचणीची झाली आहे. तसेच, पॅलेस्टिनबद्दल भारताचे “दीर्घकाळ आणि सातत्यपूर्ण” धोरण खरोखरच न बदलणारे राहिले असेल, तर या युद्धात अडकलेल्या पॅलेस्टिनी मुले, महिला आणि नागरिकांसाठी पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय आणि इतर मदत पाठवण्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणती गोष्ट रोखत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

पॅलेस्टाईन मुलांसाठी आणि महिलांसाठी मदत व गरजेचे साहित्य न पाठवता अप्रत्यक्षपणे मोदी भाजप-आरएसएसच्या गुंडांचे संतुष्टीकरन करण्याचा प्रयत्न करत आहे का? पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाबाबत भारताची सध्याची मवाळ भूमिका ही दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्व माजी पंतप्रधानांच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेच्या पूर्णपणे उलट आहे; पॅलेस्टिनींच्या बाजूने भारताने विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ठाम भूमिका मांडली पाहिजे, असं आंबेडकरांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या