राजकारण

भाजप-आरएसएस सत्तेसाठी मणिपूर, संपूर्ण देश जाळतील; राहुल गांधींचा हल्लाबोल

मणिपूर घटनेवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भाजप-आरएसएस सत्तेसाठी भुकेले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. सत्तेसाठी ते मणिपूर जाळतील, संपूर्ण देश जाळतील. त्यांना देशाच्या दु:खाची पर्वा नाही, असा घणाघात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, हरियाणा असो, पंजाब असो किंवा उत्तर प्रदेश असो, त्यांना फक्त सत्ता हवी असल्याने ते संपूर्ण देश विकतील. मात्र ही लढत काँग्रेससाठी आहे. जेव्हा जेव्हा देश दुखावला जातो किंवा देशातील नागरिक दुखावले जातात तेव्हा तुम्हालाही दुखावले जाते, असे ते म्हणाले. तुम्हाला दु:ख होईल, पण त्याच्या मनात अशी भावना नाही.

आरएसएस आणि भाजपचे लोक देशाला विभाजित करण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरसाठी काय करत आहेत? ते मणिपूरबद्दल काहीच का बोलत नाही? कारण नरेंद्र मोदींचा मणिपूरशी काहीही संबंध नाही. त्यांच्या विचारसरणीने मणिपूर जळतंय हे त्यांना माहित आहे, असा निशाणाही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर साधला आहे.

विरोधी आघाडीने एक नाव निवडले I.N.D.I.A. हे नाव आमच्या हृदयातून बाहेर पडले. आम्ही हे नाव निवडताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी I.N.D.I.A.ला शिव्या देण्यास सुरुवात केली. मोदीजींना इतका अभिमान आहे की ते I.N.D.I.A. या पवित्र शब्दाचा गैरवापर करत आहेत असे त्यांना वाटलेही नाही, असेही राहुल गांधींनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका

Rajshree More Apologizes : मराठी विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्रीने अखेर मागितली माफी; Video Viral