संजय देसाई, सांगली: जर मला मिळालं नाही खातं अर्थ, तर माझं तुमच्याकडे येणं जाईल व्यर्थ! असे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थ खात्याबाबत म्हटले होते. असं आपल्या चारोळीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलेय. जत मध्ये आपल्या दौऱ्यादरम्यान रामदास आठवले भाषणात बोलत होते.
अर्थखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते. हेच खातं अजित पवारांना देत अन्य खाते मात्र त्याच मंत्र्यांच्याकडे ठेवण्यात आले आहेत. असे असताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे जमणार नाही असे बरेच जण म्हणत आहेत, अशा पद्धतीची अनेक ठिकाणी चर्चा असतानाच आमचं जमणार नाही असे अजिबात नसून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलो आहोत असेही आठवले म्हणालेत.