राजकारण

Ravindra Dhangekar : पुण्यातून मोदींविरोधात निवडणुकीत दंड थोपटण्यास धंगेकर तयार, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मोदींसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणीसुद्धा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता उत्तरप्रदेशनंतर मोदींचे मिशन महाराष्ट्र असणार का? अशी चर्चा आता सुरु आहे.

यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे समजते. पुण्यातून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. गेली 9 वर्ष या देशामध्ये ज्या प्रकारचे राजकारण चालले आहे. आपल्या देशामध्ये भांडवलशाहीचे राजकारण सुरु झाले आहे.

जर मला उमेदवारी दिली तर मी 100 टक्के आमच्या नेतृत्वाचा विश्वासाला तडा देणार नाही. पुण्यात मी 30 वर्षे काम करत आहे. मला तिकीट दिलं तर 100 टक्के मी निवडून येईन. हा मला विश्वास आहे. कारण आज अख्खा देश भाजपाला पाडायच्या तयारीत आहे आणि त्यात मोदी आले तर आम्ही त्यांचे स्वागत करु पण निवडणूक आम्ही जिंकलो. रवींद्र धंगेकर म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Income Tax : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरातील 200 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरण; आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक

Golden Temple : अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी