Yashomati Thakur | Rajya Sabha Election team lokshahi
राजकारण

'भाजपला माफी नाही; डावपेचांचा सामना कसा करायचा हे शिवाजी महाराजांनी शिकवलं'

यापूर्वी कोणीच लोकशाहीला एवढं वेठीस धरलं नाही

Published by : Shubham Tate

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं आहे. भाजपकडून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. अखेर 7 तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावर बोलताना नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, यापूर्वी देखील निवडणुका झाल्या, मात्र यापूर्वी कोणीच लोकशाहीला एवढं वेठीस धरलं नाही. जनता यांना कधीच माफ करणार नाही, अशा डावपेचांना कसं सामोरे जायचं हे लोकांना माहिती आहे. मात्र, भाजपला माफी नाही असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. (Reaction of Yashomati Thakur on Rajya Sabha Election)

या डावपेचांचा सामना कसा करायचा हे शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. यांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, आम्हांला याने काही फरक पडणार नाही. आमचे चारही उमेदवार निवडून येतील. आता लोकशाहीत कमी जास्त होत राहतं, मात्र भाजपनं जे केलं त्यांना माफी नाही. महाराष्ट्राची निवडणूक दिल्लीला नेली, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत, महाविकास आघाडीसोबत कपट कुणी खेळणार नाही.

माझं मत असं आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारा हा दिवस आहे. याआधीही निवडणुका झाल्या मात्र असे कुणी केलं नाही, असे लोकशाहीला वेठीस कुणी धरलं नाही, भाजपने केलेलं कृत्य निंदनीय आहे, भाजपने मतदान थांबवलं, हे लोकशाहीला थप्पड मारल्यासरखं आहे, जनता यांना माफ करणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा