राजकारण

...आणि जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी; रोहित पवारांची टीका

अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला.

Published by : Siddhi Naringrekar

अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. अजित दादांसोबत राष्ट्रवादीचे 9 आमदार सरकारमध्ये सामील झाले. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरूद्ध अजित पवार असे दोन गट पक्षात पडले.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून जुंपलेली असताना आता त्यात निधी वाटपावरून आणखी भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आता रोहीत पवारांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. रोहीत पवारांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला एक बॅनर लावण्यात आलेले आहे. यात जाहिरातीचा डिजीटल बोर्ड दिसत आहे. या जाहीरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच दिसत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या जाहीरातीमध्ये दिसत नाही आहेत. यावरुन रोहीत पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काल रात्री काढलेला हा व्हिडिओ! सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी! असे म्हणत टोला लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : अशिष शेलार आणि जयंत पाटील यांची विधान परिसरात भेट

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार

MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला