(Rohit Pawar ) राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केली असून त्यांनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांच्याकडून दोन्ही बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
यामुळे आता मनसेच्या या हिंदी भाषा सक्तीविरोधातील मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, 'मराठी साठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल.' असे रोहित पवार म्हणाले.