राजकारण

उध्दव ठाकरेंना संभाजी राजेंची साथ? शिंदे-फडणवीस सरकारला इशारा;...तर उठाव होणारच

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यात वादंग माजला आहे. यावर माजी खासदार संभाजी राजे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यात वादंग माजला आहे. विरोधकांकडून राज्यपालांना हटविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद अथवा आंदोलनाची घोषणा करत सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजी राजे यांनीही सरकारला इशारा दिला आहे. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असे त्यांनी म्हंटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावरूनच संभाजी राजे यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे.

याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का, असा सवाल त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे. सोबतच कोश्यारी_हटाओ हा हॅशटॅगही वापरला आहे.

संभाजी राजे यांनी याआधीही भगत सिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटविण्याची मागणी केली होती. राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला होता.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारींना हटविण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्रद्रोह्यांना दाखवला पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचाय किंवा मोर्चा काढायचा. यासाठी तमाम शिवप्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना केले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा