राजकारण

४० मिंध्यांनी मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवावी; राऊतांचे आव्हान,...तर मी राजकारण सोडेन

महाप्रबोधन यात्रेची शेवटची सभा बीडमध्ये पार पडली. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे फेकू नंबर वन आहेत. गुगलवर फेकू शब्द सर्च केला की मोदींचा चेहरा दिसतो, असा जोरदार घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाप्रबोधन यात्रेची शेवटची सभा बीडमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ४० मिंध्यांनी मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवावी. ते जिंकले तर मी राजकारण सोडेन, असे आव्हानच राऊतांनी शिंदे गटाला दिले आहे.

दोन हजारांच्या नोटांची बंडलं कुणाकडे असतील तर ती ५० खोकेवाल्यांकडे आहेत. भाजपाच्या शेठजी गौतम अदानींकडे आहेत. मात्र कष्टकरी, शेतकरी, मजूर यांची अवस्था बिकट आहे, अशी टीका संजय राऊत यांनी नोटबंदी निर्णयावर केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे फेकू नंबर वन आहेत.

महाराष्ट्रातही घटनाबाह्य सरकार असल्या फेकू लोकांनी आणलं आहे. या फेकू सरकारचा पराभव कर्नाटकात झाला. आम्हाला सांगतात मोदींचा फोटो लावून तुम्ही महाराष्ट्रात मतं मागितली. मी त्यांना म्हणतो अरे हाड..! एक बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींना भारी होते आणि आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजवर हल्लाबोल केला आहे.

आत्ता जे ४० मिंधे तिकडे गेले आहेत त्यांनी मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवावी. ते जिंकले तर मी राजकारण सोडेन. पुन्हा कधीही बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही, असे आव्हानच राऊतांनी शिंदे गटाला दिले आहे. न्यायालयाने या सरकारला घटनाबाह्य ठरवलं. मात्र, तरीही हे सरकार राजीनामा न देता खुर्चीवर बसलं आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री