राजकारण

Sanjay Raut : शिवसैनिकांच्या अश्रूत डबल स्टॅण्डर्ड सरकार वाहून जाणार

संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकास्त्र सोडले आहे. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) दौऱ्याला होणारी गर्दी राज्यात चोऱ्यामाऱ्या करुन सत्ता स्थापन केलेल्यांना धडकी भरवणारे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पैठणमध्ये नाथसागारच जणू रस्त्यावर माणसांच्या रुपात उतरला होता. हे चित्र राज्यात चोऱ्यामाऱ्या करुन सत्ता स्थापन केलेल्यांना धडकी भरवणारे आहे. काल शिवसैनिकांचे अश्रू वाहत होते. या अश्रूत हे डबल स्टॅण्डर्ड सरकार वाहून जाणार आहे, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

भोंगा आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे. भोंगा हे भाडोत्री. मात्र, शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्षे सुरु आहे. या लाऊडस्पीकरवरील गर्जना ऐकण्यासाठी देश शिवसेनेच्या मागे उभा आहे. तुमच्या पिपाण्या लोकांनी बंद केल्या. पण, शिवसेनेचा लाऊडस्पीकर महाराष्ट्राचा बुलुंद आवाज आहे. आम्ही निर्भरपणे बोलतो. आदित्य ठाकरेही लोकांना हवाहवासा लाऊडस्पीकर आहे. उध्दव ठाकरेही लवकच बाहेर पडतील, अशी माहिती राऊतांनी दिली. तसेच, हा लाऊडस्पीकर देवेंद्र फडणवीसांना बधीर केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा. मी तयार आहे, असे आव्हानच संजय राऊतांनी फडणवीसांना दिले आहे. आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टीकणार नाहीत हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रकार नाही. तरीही चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन. सच्चे कार्यकर्ते असूनही जे त्यांच्या पोटात मळमळत होते ते ओठावर आले. नंतर खुलासा द्यायला लागला की ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पनवेलमध्ये एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री बनवावे लागले, असे वक्तव्य केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा