राजकारण

Sanjay Raut : संदीपान भुमरेंनी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर लोटांगण घातले होते

बंडखोर आमदारांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे गट (Shinde Group) आता आपल्या मतदारसंधात परतले असून शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळेच बंडखोरी केल्याचा आरोप करत आहेत. या टीकेला आज संजय राऊतांनी प्रत्युतर दिले आहे. तुम्ही नक्की ठरवा का बाहेर पडले, असे त्यांनी सांगितले आहे.

बंडखोर आमदारांविषयी बोलताना ते म्हणाले, मुंबईतून पलायन केले तेव्हा म्हंटले हिंदुत्व अडचणीत आल्याने बाहेर पडलो. नंतर म्हंटले राष्ट्रवादी कॉंग्रेसने निधी दिला नाही म्हणून बाहेर पडलो. यानंतर काही लोक विभागात हस्तक्षेप करत असल्याने बाहेर पडलो. आणि आता यानंतर माझे नाव सांगत आहे. त्यांनी बंडखोरी का केली यासाठी त्यांनी कार्यशाळा घेतली पहिजे. तुम्ही नक्की ठरवा का बाहेर पडले, असे त्यांनी सांगितले आहे.

२०१४ साली भाजपाशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. आमचे हिंदुत्व मजबूत असतानाही भाजपानं आमच्याशी युती तोडली, तेव्हा यातले कोणीच लोक काही बोलले नाहीत.२०१९ साली याच हिंदुत्ववादी भाजपानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून आमच्यावर ही वेळ आली. तेव्हा कुठे गेले होते त्यांचे हिंदुत्व, असा सवालही राऊतांनी बंडखोर आमदारांना विचारला आहे.

संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले. तेव्हा सामना कार्यालयात येऊन त्यांनी लोटांगण घातले. व तुम्ही होतो म्हणून मी मंत्री झालो, असे म्हणाले होते. याची व्हिडीओ फुटेजही आहे. संजय राठोड यांच्यवरील संकटांमध्ये शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे ठामपणे उभे राहिले होते. असो, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. आमचे मन साफ आहे. उध्दव ठाकरे यांचे मन साफ आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

शरद पवारांमुळे शिवसेना संपत आहे, असे काही जण आरोप करत आहेत. त्यांच्या पक्षातील लोकच आमच्याकडे आले आहेत. त्यांचे नेतृत्व माननारे ही लोक होते. आणि आता आरोप करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

शिवसेना खंबीर आणि मजबूत आहे. 40 लोक गेले. यामुळे शिवसेनेला काही फरक पडला नाही. शिवसेनेचे मनोबल खचले नाही तर ते वाढलच आहे. भविष्यात निवडणुका झाल्या. तर, जनता शिवसेनेच्या मागे ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?