Sanjay Raut Team Lokshahi
राजकारण

'उद्धव ठाकरे यांनी शिंदे पितापुत्राचे फाजील लाड केले' श्रीकांत शिंदेंनी भाजपला दिलेला इशाऱ्यावर राऊतांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांनी तेव्हा हे लाड केले होते. शिंदे पुत्राचे हे फाजील लाड होते. श्रीकांत शिंदेंना दोनदा तिकीट देऊन दोनदा निवडून आणले.

Published by : Sagar Pradhan

कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये आधीच वाद सुरू असताना त्यातच एका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक भाजपच्या नेत्यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली. सोबत शिंदेंच्या शिवसेनेला मदत न करण्याच्या देखील ठराव करण्यात आला. त्यावर काल श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया देत राजीनामा देण्याचा इशाराच भाजपला दिला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावरआला आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

खासदार पदाचा राजीनामा देण्याचा इशारा श्रीकांत शिंदेंनी भाजपला दिल्यानंतर यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनेशी कोणताही संबंध नसताना, पक्ष कामाशी कोणताही संबंध नसताना श्रीकांत शिंदे यांना दिली गेली. त्यासाठी गोपाळ लांडगे यांची दिलेली उमेदवारी मागे घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा हे लाड केले होते. शिंदे पुत्राचे हे फाजील लाड होते. श्रीकांत शिंदेंना दोनदा तिकीट देऊन दोनदा निवडून आणले. आता त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. प्रत्येक जागेसाठी भाजप त्यांना रडवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, शिंदे गट आता भाजप सोबत आहे. त्यांनी वेगळा गट तयार केला आहे. भाजपकडे गुलामी करत आहे. 25 वर्ष आमची त्यांच्याशी युती होती. तेव्हा प्रत्येक निवडणुकीत भाजपचे नेते आमच्यासोबत जागेसाठी संघर्ष करायचे. आमचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या उमेदवारांच्या मतदारसंघात बंड करायचे. तरीही आम्ही नातं निभावलं. आता त्यांना निभावू द्या. आता त्यांना माहीत पडेल. शिवसेना कोणत्या संघर्षातून जात होती. आम्ही भाजपशी नातं का तोडलं हे त्यांना आता कळेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा